Welcome to our online store

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Etiam id libero non erat fermentum varius eget at elit. Suspendisse vel mattis diam. Ut sed dui in lectus hendrerit interdum nec ac neque. Praesent a metus eget augue lacinia accumsan ullamcorper sit amet tellus. Duis cursus egestas hendrerit. Fusce luctus risus id elit malesuada ac sagittis magna tempus. Sed egestas fringilla turpis at ullamcorper. Pellentesque adipiscing ornare cursus.
New Products
Showing posts with label राज्य. Show all posts
Showing posts with label राज्य. Show all posts

Monday, October 3, 2011

बारामतीचा प्रस्ताव बारगळला; सांगलीला पसंती

बारामतीचा प्रस्ताव बारगळला; सांगलीला पसंती
मुंबई, २ ऑक्टोबर
अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे घेण्यात येणारे ९२ वे अ. भा. मराठी नाटय़ संमेलन २० ते २३ जानेवारी दरम्यान सांगलीत घेण्याचे निश्चित करण्यात आले असून २३ वर्षांनंतर सांगलीला नाटय़ संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीत ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन आयोजित करण्यासाठी आलेल्या विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीसाठी, जलसंपदामंत्री सुनील तटकरे रोह्य़ासाठी तर, सांगलीसाठी खासदार प्रतीक पाटील हे  नेते नाटय़ संमेलनासाठी आग्रही होते. अजित पवार यांनी तर गेल्या वर्षीच बारामतीमध्ये नाटय़ संमेलन आयोजित करण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, त्यावेळी ते होऊ शकले नाही. त्यामुळे यावेळी तरी बारामतीला संधी मिळणार, असे त्यांना वाटले होते. सांगलीत २००८ मध्ये अ.भा. मराठी साहित्य संमेलन झाल्यानंतर नाटय़ संमेलनासाठी खासदार प्रतीक पाटील यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला आज यशही आले. सांगलीत यापूर्वी १९२४ ला बाबासाहेब घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली, १९४३ मध्ये ना. वि. कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आणि १९८८ मध्ये ज्येष्ठ नाटय़ कलावंत राजाराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नाटय़ संमेलन घेण्यात आले होते.  सांगलीतील या नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण असणार, याबाबत चर्चा सुरू झाली असून त्यासाठी ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक जब्बार पटेल, अमोल पालेकर, विक्रम गोखले आणि फैय्याज यांची नावे चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Add to Cart View detail

बापूंच्या पुतळ्यासमोर सरकारला सुबुद्धी देण्याची प्रार्थना

बापूंच्या पुतळ्यासमोर सरकारला सुबुद्धी देण्याची प्रार्थना
मुंबई, २ ऑक्टोबर
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न एक महिन्यात सोडविण्याचे आश्वासन देऊन दोन महिने झाले तरी अद्याप कोणतीच हालचाल न करणाऱ्या सरकारला सुबुद्धी द्या, अशी प्रार्थना आज सुमारे दोन हजार गिरणी कामगारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येऊन केली. येत्या मंगळवारी सरकारने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत गिरणी कामगारांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याची सुबुद्धी विरोधी पक्षीयांनादेखील व्हावी, असे साकडेही या कामगारांनी महात्माजींना घातले. गिरणी कामगारांच्या घरांच्या रेंगाळलेल्या प्रश्नावर मंगळवारच्या बैठकीत काय तोडगा निघतो, याकडे आता हजारो गिरणी कामगारांचे लक्ष लागले आहे.
कामगारांना घरे देण्याच्या मागणीवरून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गाजले. गिरणी कामगारांच्या मोर्चास शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपचे विनोद तावडे, रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले आदी नेत्यांनी शक्तिनिशी जोरदार पाठिंबा दिला होता. नंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक महिन्यांत हा प्रश्न सोडविण्याचे जाहीर केले. मात्र, पात्रतेचे निकष, घरांची संख्या, किंमत आदी मुद्दय़ावर अद्यापही कोणताच निर्णय न झाल्याने अखेर आज गिरणी कामगार पुन्हा रस्त्यावर आले. या प्रश्नावर येत्या  मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यासंबंधीचे पत्र सरकारतर्फे गिरणी कामगारांच्या संबंधित नेत्यांना अगोदरच पाठविण्यात आल्याने, सरकारविरोधी निदर्शनांऐवजी, प्रार्थना मेळावा आयोजित करून ‘गांधीगिरी’चा मार्ग आज गिरणी कामगारांनी अवलंबिला. त्याआधी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या कामगारांची भेट घेऊन कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
आता येत्या मंगळवारच्या बैठकीत विरोधी पक्ष या मुद्दय़ावर कोणती भूमिका घेतात, यावर या प्रश्नाते भवितव्य अवलंबून असल्याचे कामगार नेत्यांचे मत आहे. सभा-मोर्चासमोर घोषणा देणे वेगळे, आणि सरकारला निर्णय घेण्यास भाग भाग पाडणारी भूमिका घेणे वेगळे, त्यामुळे, मंगळवारी विरोधी पक्षांची भूमिका मंगळवारी अधिक निर्णायक ठरेल, असे मत गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांनी व्यक्त केले.
Add to Cart View detail

मुंबईत रिक्षा चालकांचे आज आंदोलन

मुंबईत रिक्षा चालकांचे आज आंदोलन
आता हवी भाडेवाढ प्रवाशांना वेठीस धरण्याची खेळी
मुंबई, २ ऑक्टोबर
मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) केलेल्या कारवाईविरोधात काही दिवसांपूर्वी अघोषित बंद पुकारून प्रवाशांना वेठीस धरणारे रिक्षा चालक उद्या सोमवारी कामगार नेते शरद राव यांच्या ‘मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन’च्या झेंडय़ाखाली पुन्हा रस्त्यांवर उतरून आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात ९० हजारपैकी सुमारे दहा हजार रिक्षा चालक सहभागी होण्याची शक्यता आहे. मीटर रिक्षा सेवा बंद करून शहरात सर्वत्र शेअर रिक्षा सुरू करावी आणि चालकांना महिन्याला किमान २५ हजार रुपये उत्पन्न मिळेल इतकी रिक्षा भाडेवाढ द्यावी, अशी मागणी आता करण्यात आली आहे. वांद्रे येथील परिवहन आयुक्त कार्यालयाबाहेर सकाळी ११ ते संध्याकाळी पाच या वेळेत धरणे देऊन रिक्षा चालक हे आंदोलन करणार आहे. या आंदोलनात १० हजार रिक्षा चालक सहभागी होणार असल्याचा दावा राव यांनी केला असून काही चालक आपल्या रिक्षासुद्धा घेऊन येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. इतक्या मोठय़ा संख्येने रिक्षा रस्त्यांवर न आल्यास उपनगरवासीयांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. बेस्ट आणि पालिका संपाचा अनुभव लक्षात घेता रिक्षांचा अघोषित बंद पुकारून प्रवाशांना वेठीस धरण्याची खेळी राव यांच्याकडून खेळली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या महिन्यात अंधेरी आरटीओने पश्चिम उपनगरांत मीटर जलद करून प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात एका रात्रीची धडक मोहीम राबविली होती. काही तासांत १५० रिक्षांची तपासणी करून त्यापैकी ९७ रिक्षांच्या मीटरमध्ये फेरफार केला असल्याचे तर १८ रिक्षांची कागदपत्रे बोगस असल्याचे आढळून आले आहे. या शिवाय १७ रिक्षा चालकांवर भाडे नाकारल्याबद्दल कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे धास्तावलेल्या रिक्षा चालकांनी अघोषित बंद पुकारून तात्काळ आपले मीटर दुरूस्त करून घेतले. त्यावेळी जनप्रक्षोभ लक्षात घेऊन आरटीओच्या कारवाईचे समर्थन करणाऱ्या रिक्षा संघटना आरटीओवर दबाब टाकण्यासाठी ही नवी खेळी करीत आहे, असेही वाहतूक क्षेत्रात बोलले जात आहे.
Add to Cart View detail

ममता बॅनर्जींचा दणदणीत विजय

ममता बॅनर्जींचा दणदणीत विजय
कोलकता - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या. त्यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार नंदिनी मुखर्जी यांचा पराभव केला.
पश्‍चिम बंगालमध्ये गेल्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा पराभव करून तृणमूल कॉंग्रेस सत्तेवर आला होता. रेल्वेमंत्री असलेल्या बॅनर्जी यांनी दिल्ली सोडून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सहा महिन्यात निवडून यायचे असल्याने त्यांनी भवानीनगरमधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. या मतदारसंघाचे आमदार सुब्राता बॅनर्जी यांनी राजीनामा दिल्याने येथे गेल्या 25 सप्टेबररोजी पोटनिवडणूक झाली. ममता बॅनर्जी यांचा 54,213 हजार मतांनी दणदणीत विजय झाला.
Add to Cart View detail

कॉंग्रेसचे दात घशात घालू - उद्धव ठाकरे

कॉंग्रेसचे दात घशात घालू - उद्धव ठाकरे
मुंबई - मुंबई महापालिकेचे विभाजन करण्याच्या मागणीवरून आज शिवसेना, भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह सर्वच विरोधकांनी टीकेचे रान उठविले. मुंबई तोडण्याची भाषा करणाऱ्यांचे दात त्यांच्याच घशात घालू, असा सडेतोड इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एकीकडे दिला; तर हे पिल्लू ज्याने कोणी सोडले तो पुढे येऊ दे, मग मी बोलतो, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली. भाजप लोकशाही मार्गाने या मागणीस विरोध करेल, असे भाजपचे मुंबई अध्यक्ष गोपाळ शेट्टी यांनी ठणकावून सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या मागणीला ठाम विरोध दर्शविला असून, मुंबई महापालिकेच्या विभाजनाची आवश्‍यकता नसल्याचे ठाम मत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई महापालिकेचे शहर व उपनगर असे विभाजन करावे व उपनगरासाठी स्वतंत्र आयुक्त नेमावा, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी काल सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत केली होती. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या साक्षीने करण्यात आलेल्या या मागणीला शिवसेनेने कडाडून विरोध केला. आज यावर सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र शब्दांत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
दात घशात घालू - उद्धव ठाकरे
कॉंग्रेसचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे या मागणीवरून सिद्ध होते. कॉंग्रेसच्या नेत्यांशीच लढून मराठी माणसाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविला. आज संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात कॉंग्रेसकडून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव. कॉंग्रेसचा हा डाव शिवसेना कदापि यशस्वी होऊ देणार नाही. कॉंग्रेसचे हे दात घशात घातल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, अशी टीकेची झोड शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उठविली.
मुंबईचे पालकत्व एकाच संस्थेकडे ठेवायला हवे हे आम्ही खूप वर्षांपासून सांगत आलो आहोत. मुंबईतील सर्व बाबींसाठी जर महानगरपालिकेला जबाबदार धरले जात असेल, तर महानगरपालिकेला तसे अधिकारही द्यायला हवेत. याउलट एमएमआरडीएसारख्या संस्था महानगरपालिकेच्या डोक्‍यावर राज्य करतात. कॉंग्रेसची ही पद्धत आहे, की एखाद्या छोट्या माणसाकडून पुडी सोडायची आणि क्रिया-प्रतिक्रिया काय होतात ते पाहायचे. कॉंग्रेसचा मुंबई महाराष्ट्रापसून तोडण्याचा हा डाव मुंबईतील मराठी माणूस आणि शिवसेना कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
Add to Cart View detail
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. HINDU LEDGER - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger