Sunday, October 2, 2011

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ‘रनर’ बाद

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ‘रनर’ बाद
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ‘रनर’ बाद
स्रोत: तरुण भारत
नवी दिल्ली, १ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शनिवारपासून अनेक बदल करण्यात आले असून, मे महिन्यात झालेल्या आयसीसीच्या बैठकीत केलेल्या शिफारशींना मंजुरी देण्यात आली. मुख्य बदल म्हणजे आता खेळाडूला ‘रनर’ घेता येणार नाही. हे नवीन नियम भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारी एकदिवसीय क़्रिकेट मालिका नव्या नियमानुसार खेळविली जाणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले. नियमात झालेले बदल असे. आता दोन चेंडूंचा वापर करण्यात येईल. दोन्ही बाजूने दोन वेगवेगळ्या चेंडूंचा वापर करण्यात येईल. एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० सामन्यांमध्ये फलंदाजांना ‘रनर’ घेता येणार नाही. जर कोणता फलंदाज जाणूनबुजून क्षेत्ररक्षण करणार्‍या खेळाडूच्या समोर आला, तर पंच त्याला धावचित देण्याचा निर्णय घेऊ शकतात. एकदिवसीय सामन्यांमध्ये पाच-पाच षटकांचा पॉवर प्लेचा दुसरा व तिसरा पॉवर प्ले १६ व्या आधी आणि ४० व्या षटकानंतर घेता येणार नाही. सुरुवातीच्या नियमानुसार पहिल्या दहा षटकांमध्ये असलेल्या पॉवर प्लेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. परंतु, हा नियम जो सामना पावसामुळे प्रभावित झालेला नसेल त्या सामन्यात लागू होईल. रनर एण्डचा फलंदाज, गोलंदाजपूर्वी धाव घेत असेल, तर त्याला धावचित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण, याचा निर्णय मैदानी पंचावर सोपविण्यात आला आहे.
Add to Cart

Related Product :

0 comments:

Post a Comment

Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. HINDU LEDGER - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger