पुनर्जन्माला कारण वासना
नादवंश
प्राचिन काळी शिष्याला नि:स्वार्थ भावनेने शिक्षण दिल्या जात होते. नदी किंवा झाड ज्याप्रमाणे अपेक्षारहित दान करते त्याप्रमाणे गुरूकुलात विद्यार्थ्याला विद्यादान व अन्नदान गुरू निरपेक्ष बुद्धीनेच देत असत. अशा आदर्श गुरूकडून विद्या प्राप्त केलेला शिष्य गुरूचे ऋण फेडण्याच्या भावनेनेच गरूला गुरूदक्षिणा देत असे.
श्रीकृष्णाने नाहीका गुरूकडून विद्या घेतली व अत्यंत नम्रतेने गुरूला दक्षिणा देण्याची इच्छा प्रगट केली, सांदिपनी गुरूनीही निस्पृहतेने म्हटले की ''माझ्या सारखा तू ही नि:स्पृहतेने विद्यादान कर व विद्येचा प्रसार कर'' जगात दोन वंश चालतात पुत्रपरंपरेचा बिंदुवंश आणि शिष्यपरंपरेचा नादवंश श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला आणि आपल्या महाप्रयाणाच्या वेळी उद्धवाला उत्तम उपदेश दिला व आपल्या गुरूचा नादवंश वाढविण्याची खरीखरी गुरूदक्षिणा दिली.
(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
मनच ममता आणि अहंकार निर्माण करते.
Add to Cart

0 comments:
Post a Comment