Welcome to our online store

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Etiam id libero non erat fermentum varius eget at elit. Suspendisse vel mattis diam. Ut sed dui in lectus hendrerit interdum nec ac neque. Praesent a metus eget augue lacinia accumsan ullamcorper sit amet tellus. Duis cursus egestas hendrerit. Fusce luctus risus id elit malesuada ac sagittis magna tempus. Sed egestas fringilla turpis at ullamcorper. Pellentesque adipiscing ornare cursus.
New Products
Showing posts with label कला. Show all posts
Showing posts with label कला. Show all posts

Tuesday, October 4, 2011

लोकमनावर अधिराज्य गाजवणारा आवाज

लोकमनावर अधिराज्य गाजवणारा आवाज
सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही असे म्हटले जाते.
त्यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला.
आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशाताईंना संधी मिळणे अवघड होते. या गायिकांच्या राज्यात राहून, गाऊन, आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे, स्वतःला सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशाताईंपुढे होते. या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांशी सामना करत करत आशाताईंनी ते आव्हान स्वीकारले आणि ते स्वबळावर, आत्मविश्वासाने यशस्वीपणे पेलून दाखवले.
इ.स. १९५७- इ.स. १९५८ हे वर्ष आशा भोसले यांचेच होते. सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशके आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर काम केले. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले. एवढेच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केले.
ओ. पी. नय्यर आणि आशाताई एक अफलातून जोडी होती. इ.स. १९६० च्या सुमारास नय्यर यांचे संगीत असणारे ‘ऑखोसे जो उतरी है दिलमे’ (फिर वही दिल लाया हूँ ) हे गाणे; इ.स. १९६५चे ‘जाइंये आप कहाँ’ (मेरे सनम); इ.स. १९६८ मधले ‘वो हसीन दर्द देदो’ (हम साया); चैन से हमको कभी -अशी मदहोश करणारी गाणी रसिकांच्या हृदयावर राज्य करायला लागली.
राहुल देव बर्मन यांच्याबरोबर काम करताना ‘पिया तू अब तो आजा’ हे इ.स. १९७१ चे कारवाँ चित्रपटातील गीत, इ.स. १९७१ चेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते ‘दम मारो दम’; ‘जाने जा’ हे इ.स. १९७२ चे जवानी दिवानीतले गाणे, ही गाणी आशा भोसलेंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. इ.स. १९८१ चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, इन आँखोंकी मस्तीसारखी शब्दरचना हे सगळेच जमून आले. ‘दिल चीज क्या है’ या गीताला इ.स. १९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे ‘इजाजत’ चित्रपटातल्या ‘मेरा कुछ सामान’ या त्यांच्या गाण्यालाही इ.स. १९८६ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
हिंदीबरोबर आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच होती. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक-गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिकमनात घर करून राहिली आहेत. बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोघे यांच्या कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजुनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती - अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ची गोडी, सगळेच विलक्षण!
त्यांनी ज्यांच्यासाठी गाणी गायली ते संगीतकार, ते गीतकार, त्या अभिनेत्री आणि आशा भोसलेंचा आवाज - या सर्वांच्या परस्परसंबंधांचे संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्या वर्णन करणे हे एक अशक्यप्राय काम आहे. त्याचबरोबर आशाताईंनी गायलेली चित्रपटगीते (मराठी, हिंदी व अन्य भाषांतील), भावगीते, गझल, भजने-भक्तिगीते इत्यादी गाण्यांची व संबंधित चित्रपटांची केवळ यादी करायची ठरवली, तरी ते एक आव्हानात्मक काम आहे.
हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशा भोसले यांनी एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर-श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. मधुबाला-मीनाकुमारीपासून ते अलीकडच्या तब्बू-उर्मिला मातोंडकर-ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमार व सुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच, तसेच त्या आज हृषीकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत. आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.
नाच रे मोरा, आईए मेहेरबाँ, दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत), तनहा तनहा यहाँ पे जीना, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांज ये गोकुळी, जानम समझा करो, मागे उभा मंगेश... ही ‘रेंज’च अफाट आहे, हा आवाकाच अविश्वसनीय आहे. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीते, मराठी-हिंदी चित्रपट गीत्गे, नाट्यगीते, गझली, लावण्या, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी - अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई आजही तेवढ्याच ताकदीने गाऊ शकतात.
कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, स्वीडन आदी अनेक देशांत झालेले कार्यक्रम, परकीय संगीतकारांबरोबर केलेले काम, ‘राहुल अँड आय’ सारखा अल्बम, लेस्ली लुईसबरोबरचे काम असे अनेक नवनवे प्रयोग आशाताई आजही करतात. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला. ‘आशा अँड फ्रेन्ड्‌स’ या अल्बमचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. अभिजात संगीत कलेला जसे स्थळ-काळ-वेळाचे बंधन नाही, तसेच आशाताईंच्या आवाजालाही या कशाचेच बंधन नाही.
राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच इ.स. २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार- हे पुरस्कार आशा भोसलेंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये देण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला.
आशा भोसले या मंचावरून एक ‘उत्कृष्ट परफॉर्मर’ म्हणून रसिकांसमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणार्‍या एक परिपूर्ण गृहिणी आहेत; क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत. एवढे यश, मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री-कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच त्यांना वडिलांचा (दीनानाथांचा) अभिमान आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी (सहगायक, संगीतकार, गीतकार, सहवादक, स्टुडिओतील कर्मचारी ... इत्यादी) या गोष्टी न विसरणार्‍या ,किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणार्‍या आशाताई ह्या एक ‘संवेदनशील माणूस’ आहेत.
Add to Cart View detail

वाह उस्ताद...!

वाह उस्ताद...!
उस्ताद झाकीर हुसेन आणि त्याची जुगलबंदी रंगत जाते, दोघांचीही बोटं तितक्याच ताकदीने तबल्यावर थिरकतात, कोणीही मागे हटायला तयार नाही, अखेर समाधानी चेहऱ्याने झाकीर हुसेन म्हणतात 'वाह उस्ताद!' आणि त्यावर तो मुलगा म्हणतो, 'अरे हुजूर, वाह ताज बोलिये!' आठवते ती जाहिरात? ब्रूकबॉण्डच्या जाहिरातीतील तो लहान मुलगा म्हणजे आजचा आघाडीचा संगीतकार आदित्य कल्याणपूर...
घरात संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शास्त्रीय संगीताची कास धरून आदित्यने केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील आपला ठसा उमटवला आहे. आदित्यचे वडील मेकॅनिकल इंजिनीअर, तर आई बालमोहन शाळेत कम्प्युटर डिपार्टमेंटची विभागप्रमुख. मात्र आपल्या मुलाला संगीताची, विशेषत: तबल्याची आवड आहे; हे त्यांनी जाणलं होतं. 'मी डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावं, अशी अपेक्षा माझ्या आई-वडिलांनी कधीच केली नव्हती आणि ते माझ्य दृष्टीने अतिशय महत्त्वाचं होतं,' आदित्य अभिमानाने सांगतो.
साधारणपणे तीन वर्षांचा असतानाचा एक प्रसंग आदित्य आवर्जून नमूद करतो. 'एकदा चुकून माझा पाय तबल्याला लागला, तेव्हा आई मला ओरडली आणि तिने मला तबल्याला नमस्कार करायला सांगितला. तबल्यात देव असतो, असं तिने मला सांगितलं. त्यावर मी तिला विचारलं, कुठे आहे देव? ती म्हणाली तो तबल्याच्या आत असतो, दिसत नाही. त्यानंतर काही दिवसांनी तिला तबला फुटलेला दिसला. तिने मला विचारलं, तेव्हा मी सांगितलं, की मी तबला फोडला. कारण मला देव बघायचा होता. यावर तिला हसावं की रडावं तेच समजेना.' असं तबल्याशी आदित्यचं नातं जुळलं.
अगदी लहान असल्यापासून आदित्यला तालाचं ज्ञान होतं आणि हे त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांनी आदित्यला तबल्याचं शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. वयाच्या सातव्या वषीर् आदित्यने उस्ताद अल्लारखाँ यांच्याकडे तबला शिकण्यास सुरुवात केली. 'वाह ताज'च्या जाहिरातीसाठी त्यांनीच आदित्यचं नाव सुचवलं होतं. शाळा, कॉलेज सुरू असतानाच आदित्यने उस्ताद झाकीर हुसेन यांच्याबरोबर कॉन्सर्टमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. कॉलेज म्हणजे फक्त आईच्या समाधानासाठी होतं, असं तो सांगतो. मात्र शाळा-कॉलेजमध्येही तो विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असे. अनेक स्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. कॉलेज फेस्टिवल हे तरुणांना आणि त्यांच्या करियरला दिशा देणारे असतात, असं त्याला वाटतं. सिडनहॅम कॉलेजमध्ये दोन वर्षं शिकल्यानंतर मिठीबाई कॉलेजने त्याला स्वत:हून कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची विनंती केली होती. त्याने ती स्वीकारलीदेखील. कॉलेजातील त्याच्या बरोबरीची मुलं जेव्हा मजा करत होती, तेव्हा आदित्य दिवसाचे किमान ८ ते १० तास रियाज करत होता, कॉन्सर्ट करत होता.
आदित्यने आत्तापर्यंत उस्ताद झाकीर हुसेन, पंडित जसराज, उस्ताद अमजद अली खान, डॉ. प्रभा अत्रे, पंडित शिवकुमार शर्मा, शंकर महादेवन, ए. आर. रहमान अशा अनेक दिग्गजांबरोबर काम केलंय. त्याबद्दल बोलताना आदित्य म्हणतो, 'या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळणं म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच होती. या महान कलाकारांबरोबर काम करताना प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि ती संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे.'
माझ्या गुरूंनी मला केवळ तबला शिकवला नाही, तर एक चांगला माणूस म्हणून जगणं शिकवलं आहे, असं तो सांगतो. पंजाब घराण्याची परंपरा पुढे चालवणाऱ्या आदित्यकडे उस्ताद झाकीर हुसेन यांचा वारसदार म्हणूनही पाहिलं जात आहे.
शास्त्रीय संगीतात करियर करणाऱ्या तरुणांची संख्या आजही खूप कमी आहे, आदित्यने मात्र ते धाडस केलं. तबल्याचा प्रसार करण्यासाठी त्याने अमेरिकेत 'न्यू इंग्लंड स्कूल ऑफ म्युझिक' स्थापन केली आहे. आजवर हार्वर्ड, एमआयटी, कॉनेर्ल, कोलंबिया, येल, बोस्टन, अशा अनेक युनिव्हसिर्टीजमध्ये त्याने आपली कला पेश केली आहे. हार्वर्ड विद्यापीठाची संगीत म्युझिक स्कूल आणि बोस्टनमधील रंगांजली स्कूल ऑफ म्युझिकमध्ये त्याला शिकवण्याचीही संधी मिळाली. एस्टोनियातील नावाजलेल्या 'ओरिएण्ट आर्ट फेस्टिव्हल'मध्ये तबलावादन करणारा आदित्य हा पहिला कलाकार आहे. जगभरातील नावाजलेल्या फेस्टिव्हल्समध्ये आदित्यने परफॉर्म केलं आहे. पण हे सगळं करताना रियाज, नवनवीन गोष्टी शिकणं, प्रयोग करणं, या गोष्टी आदित्यने सुरूच ठेवल्या. कॅन्सरमुळे आईचा मृत्यू झाल्यानंतर आदित्यने मुंबईत 'शामल म्युझिक फाऊंडेशन'ची स्थापना केली आहे. कॅन्सर पेशंटसाठी ही संस्था विविध उपक्रमांद्वारे निधी गोळा करते.
भारतीय कलांची परंपरा अतिशय समृद्घ आहे. अनेक दशकांपूवीर् होऊन गेलेल्या कलाकारांना आजही आपण ऐकतो, म्हणजे त्यांनी नक्कीच काहीतरी 'ग्रेट' केलं आहे. पण त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे ती महान परंपरा तरुणांनीच जपली पाहिजे. शास्त्रीय संगीतात करियर करायचं असेल, तर वेळ देणं अतिशय गरजेचं आहे. सध्याच्या रिअॅलिटी शोजमधून संगीत शिकता येणार नाही, असं तो सांगतो. ते केवळ दिखाऊ आहे. खरोखर संगीत शिकायचं असेल, तर त्यासाठी साधना केली पाहिजे. शास्त्रीय संगीत जगवायचं असेल, तर तरुणांनी ते ऐकलं पाहिजे, असं तो सांगतो.
' सूर सिंगार समिती'ने आदित्यला 'ताल मणी' हा किताब बहाल केला आहे. याशिवाय अनेक पुरस्कारांनी त्याला गौरविण्यात आलं आहे. पुढील वषीर् तो स्वत:चा पहिला सोलो अल्बम लॉँच करणार आहे. संगीताला आयुष्य समपिर्त केलेल्या आणि गुरुंची शिकवण जपणाऱ्या आदित्यला पुढच्या प्रवासासाठी हवे आहेत केवळ रसिकांचे आशीर्वाद!
स्नेहल जोशी-कुळकर्णी
Add to Cart View detail

Monday, October 3, 2011

स्वरलतेचे ८२व्या वर्षात पदार्पण; गानमैफिलीचा चित्रमय प्रवास

स्वरलतेचे ८२व्या वर्षात पदार्पण; गानमैफिलीचा चित्रमय प्रवास
स्वरलतेचे ८२व्या वर्षात पदार्पण; 
गानमैफिलीचा चित्रमय प्रवास
‘मेरी आवाज ही मेरी पहचान है’ असं म्हणत भारतीय रसिकांच्या मनावर मागील ६९ वर्षांपासून अधिराज्य गाजवणारी ‘गानकोकिळा’ आज (बुधवार) ८२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. 
मराठी, हिंदीप्रमाणंच इतरही अनेक भाषांमधून लता दीदींनी चाळीस हजारांच्या वर गाणी गायली आहेत. साक्षात् देवी सरस्वतीच लता दीदींच्या ओठांवर अवतरली आहे, असं म्हणलं जातं.
लता दीदी म्हणलं की एक प्रसन्न व्यक्तिमत्व, लांबसडक केस, दोन वेण्या, जरी बॉर्डर असलेली पांढरी साडी, कायम दोन्ही खांद्यांवर पदर असं साधं पण तितकंच आकर्षक रूप आपल्या डोळ्यांसमोर येतं.
Add to Cart View detail
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. HINDU LEDGER - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger