Welcome to our online store

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Etiam id libero non erat fermentum varius eget at elit. Suspendisse vel mattis diam. Ut sed dui in lectus hendrerit interdum nec ac neque. Praesent a metus eget augue lacinia accumsan ullamcorper sit amet tellus. Duis cursus egestas hendrerit. Fusce luctus risus id elit malesuada ac sagittis magna tempus. Sed egestas fringilla turpis at ullamcorper. Pellentesque adipiscing ornare cursus.
New Products
Showing posts with label मनोरंजन. Show all posts
Showing posts with label मनोरंजन. Show all posts

Monday, October 3, 2011

'धूम-३'मध्ये कतरिना कैफ

'धूम-३'मध्ये कतरिना कैफ
नवी दिल्ली: 'धूम-३' या चित्रपटामध्ये प्रमुख नायिकेच्या भूमिकेत कतरिना कैफ दिसणार असून अभिनेता अमिर खानच्या बरोबर तिचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे, अशी माहिती दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांनी दिली.
'यश राज फिल्म्स'च्या 'धूम' चित्रपटाचे पहिले दोन भाग चांगलेच गाजले होते, आता या तिसऱ्या भागात अमिर खानसारखा निवडक चित्रपट करणारा अभिनेता घेऊन नवीन चित्रपटाचीही पायाभरणी जोरात झाली आहे. त्यात आणखी सध्या लोकप्रियतेच्या जोमात असलेल्या कतरिनाला घेऊन हा चित्रपटही तिकीट खिडकीवर उत्साह आणेल अशी चिन्हे आहेत.
सुरुवातीला निर्माते आदित्य चोप्रा व दिग्दर्शक आचार्य यांना 'धूम-३'मध्ये नायिकेच्या भूमिकेसाठी नवीन चेहरा हवा होता, परंतु खूप शोध घेतल्यानंतर त्यांनी कतरिनाचेच नाव निश्चित केले. नुकताच कतरिनाचा 'मेरे ब्रदर की दुल्हन' हा 'यश राज'च्या बॅनरखालचा चित्रपट प्रदर्शित झाला.
'जेव्हा नवीन चेहरा घ्यायचा नाही असे ठरले तेव्हा आमचा पहिला पर्याय कतरिनाच होती. तिच्यामुळे चित्रपटात प्रचंड उत्साह आणि जबाबदारीची जाणीव येईल याची आम्हाला खात्री आहे.
यापूर्वी धूम (२००४) व धूम-२ (२००६) या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला होता. 'धूम-३'मध्ये अभिषेक बच्चन व उदय चोप्रा यांची पोलिसी जोडी कायम असून चोराची भूमिका अमिर खानकडे आली आहे नि चोराची साथीदार असणारेय कतरिना कैफ.
Add to Cart View detail

भारतीय चित्रपटांत चुंबनाची गरज नाही: जेनेलिया

भारतीय चित्रपटांत चुंबनाची गरज नाही: जेनेलिया
मुंबई: 'भारतीय चित्रपटांमध्ये चुंबनदृश्यांची काही आवश्यकता नाही. केवळ लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी बहुतेक वेळा त्याचा वापर केला जातो', असे अभिनेत्री जेनेलिया डिसुझाने म्हटलंय.
'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून नंतर 'जाने तु या जाने ना' या चित्रपटात आपल्या कौशल्याची दखल जाणकारांना घ्यायला लावून आता 'फोर्स' या चित्रपटात जॉन अब्राहमबरोबर काम करत हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रवासाचा 'फोर्स' जेनेलियाने दाखवून दिलाय. फोर्स'मध्ये जॉनबरोबर काही प्रणयदृश्ये असल्याबद्दल एका इंग्रजी वृत्तपत्राने जेनेलियाला छेडले असता ती म्हणाली, 'आम्ही दोघेही कॅमेरावर रिलॅक्स दिसतोय आणि आमची जोडीही चांगली दिसते आहे. 'फोर्स'मध्ये अनेक जवळीक दाखवणारी दृश्यं आहेत. हा एक मारधाडपट आहे, पण त्याच वेळी दोन प्रौढ व्यक्तींमधली प्रेमकथाही आहे. त्यामुळे चित्रपटात प्रणय साहजिकपणे आहेच.'
पण याच वेळी भारतीय चित्रपटसृष्टीत चुंबन दृश्यांची गरज नसते असेही तिने स्पष्ट केले.जेनेलियाचा पहिल्या चित्रपटातील सहकलाकार रितेश देशमुख याच्याशी असलेली तिची मैत्रीही चर्चेचा विषय ठरत असते. त्याबद्दलही जेनेलियाने दिलखुलास उत्तर दिलं; 'माझ्या इतरांशी असलेल्या मैत्रीपेक्षा रितेशशी माझी मैत्री बराच काळ टिकलेय. मी माझा पहिला चित्रपट त्याच्याबरोबर केला. जेव्हा तुम्ही तुमची कारकिर्द एखाद्याबरोबर सुरू करता तेव्हा तुम्ही मित्रच होता. ते केवळ सह-कलाकाराचं नातं उरत नाही. म्हणून रितेश आणि माझ्यामध्ये मैत्री कायम आहे. पण जेव्हा काही सांगण्यासारखं असेल तर मी जगाला ते सांगेन.
Add to Cart View detail

रात्री उशिरापर्यंत पार्टीचा धिंगाणा दीपिकाला पोलिसांची समज

रात्री उशिरापर्यंत पार्टीचा धिंगाणा दीपिकाला पोलिसांची समज

स्रोत: तरुण भारत
मुंबई, ३ ऑक्टोबर
चित्रपट तारे-तारका यांच्या रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या पार्ट्या शेजार्‍यांसाठी तापदायक असतात. असाच काहीसा प्रकार दीपिका पदुकोण हिच्या बाबतीतही घडला. तिने नव्या घरी ठेवलेल्या पार्टीतील रात्री उशिरापर्यंत धिंगाणा पाहून चक्क पोलिसांना पाचारण करण्याची वेळ तिच्या शेजार्‍यांवर आली. दीपिकाने नुकतेच प्रभादेवी येथे नवे घर घेतले आहे. त्यानिमित्ताने तिने घरी एक पार्टी ठेवली होती. बॉलीवूडच्या प्रथेनुसार पार्टी रात्री उशिराच सुरू झाली. हळूहळू पार्टी रंगू लागली तसा उपस्थितांचा उन्मादही वाढला आणि संगीताचा, डीजेचा आवाजही कर्कश व्हायला लागला. आजुबाजूच्या लोकांना याचा त्रास जाणवू लागला. थोड्या वेळाने या इमारतीत साध्या वेषातील पोलिस आले आणि दीपिकाला समज देऊन निघून गेले. याबाबत दादर पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी शेजार्‍यांनी तक्रार केली नसल्याचे सांगितले. आम्ही इमारतीसमोरील गर्दी पाहून आत शिरल्याचे पोलिसांनी सांगितले. पण, प्रत्यक्षात सेलिब्रिटींच्या पार्ट्यांमुळे शेजार्‍यांची झोपमोड झाली असावी, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
Add to Cart View detail

Sunday, October 2, 2011

संजूबाबाकडून रणबीरला ३० लाखांची बाईक भेट

संजूबाबाकडून रणबीरला ३० लाखांची बाईक भेट
संजूबाबाकडून रणबीरला ३० लाखांची बाईक भेट
स्रोत: तरुण भारत
मुंबई, २९ सप्टेंबर -अभिनेता संजय दत्तने युवा अभिनेता रणबीर कपूरला ३० लाख रुपये किमतीची बाईक भेट म्हणून दिली आहे.
कालच रणबीरचा २९ वा वाढदिवस झाला. यानिमित्ताने त्याच्या आगामी ‘रॉकस्टार’ चित्रपटाच्या टीमने एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. यात चित्रसृष्टीतील अनेक तारे-तारका सहभागी झाल्या. त्यावेळी संजय दत्तने रणबीरला ही महागडी बाईक भेटीदाखल देत सर्वांना आश्‍चर्याचा धक्काच दिला. संजूबाबाकडून इतकी महागडी भेट दिली जाईल, असा विचारही कोणी केला नव्हता.
Add to Cart View detail

जेनेलियाची नवीन इमेज

जेनेलियाची नवीन इमेज
जेनेलियाची नवीन इमेज
स्रोत: तरुण भारत
 मुंबई, २ ऑक्टोबर - एकाच साच्यातील भूमिका करून जेनेलिया डिसुजा बोर झाली आहे. म्हणूनच तिने दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या ‘फोर्स’ या नवीन चित्रपटात एक वेगळी भूमिका केली आहे. या भूमिकेमुळे तिची इमेज एकदमच बदलेल, असे जेनेलियाचे म्हणणे आहे.
फोर्स चित्रपटात जेनेलियाने एका मॅच्युअर महिलेची भूमिका केली आहे. याआधी जेनेलियाने चुलबुल्या नायिकांच्या भूमिका पार पाडल्या आहेत.
बर्‍याच काळापासून जेनेलिया अशा भूमिकेच्या शोधात होती. फोर्स चित्रपटातील माया नावाच्या भूमिकेची ऑफर आल्यानंतर जेनेलियाची इच्छा पूर्ण झाली आहे. जेनेलिया आपल्या भूमिकेबद्दल अतिशय समाधानी आहे. या चित्रपटात ती फक्त एक शोपीस म्हणून वावरणार नसून यात तिची महत्त्वाची भूमिका आहे.
Add to Cart View detail

चित्रपट तयार होण्याआधीच कमावले १२५ कोटी

चित्रपट तयार होण्याआधीच कमावले १२५ कोटी
चित्रपट तयार होण्याआधीच कमावले १२५ कोटी
स्रोत: तरुण भारत
 मुंबई, २ ऑक्टोबर - हृतिक रोशनचा आगामी चित्रपट ‘क्रीश-२’ने तयार होण्याआधीच १२५ कोटींची कमाई करून टाकली आहे.
हे असे कसे झाले, असे वाटेल. पण, आजकाल बड्या कलावंतांचे चित्रपट तयार होण्यापूर्वीच विकले जातात. ज्या कलावंतांच्या ‘चलनी नाण्या’विषयी वितरकांना विश्‍वास असेल अशांचे चित्रपट तयार होण्यापूर्वीच विकत घेतले जातात. ‘सिंघम’च्या यशाने अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘सन ऑफ़ सरदार’ याने ८० कोटी कमावले आहेत. हृतिकच्या ‘क्रीश’ला मिळालेले यश पाहता वितरकांनी याचा दुसरा भागही सव्वाशे कोटींना विकत घेतला आहे.
Add to Cart View detail
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. HINDU LEDGER - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger